Photo Gallery : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जल्लोषात स्वागत, पाहा फोटो
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात परतले, यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकनाथ शिंदे म्हणाले, 15 दिवसांनंतर मी ठाण्यातील माझ्या घरी परतलो आहे. मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला.
भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील कार्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री भेट दिली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपा ठाणे जिल्ह्याच्या वतीने आमदार व भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे,महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे,यांच्यासह माजी नगरसेवक सूनेश जोशी, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, स्नेहा रमेश आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना संपणार, अशा चर्चा होत्या. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेनं आजही ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम आहे.असे मुख्यमंत्री म्हणाले.
image 5
image 6
image 7