52 मीटर उंचीचा निसर्गरम्य 'गोकाक धबधबा' प्रवाही; पर्यटकांची गर्दी, असं पोहचा
पावसाळ्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच, महाराष्ट्रातील धबधब्याची ठिकाणं असलेल्या स्थळांना पर्यटक भेटी देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुनच्या पहिल्याच आठवड्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यातील धबधबे वाहू लागले आहेत, ओढ्यांना व नद्यांनाही पाणी आलं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधबाही काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. या धबधब्याची उंची 52 मीटर इतकी आहे.
घटप्रभा नदीला पाणी आल्यावर पाण्याचा प्रवाह खाली कोसळताना पाण्याचे तुषार उडतात ते एक किलोमीटर अंतरापर्यंत उडतात. तसेच, ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असतो त्यावेळी इंद्रधनुष्य देखील पाहायला मिळते.
धबधब्याच्या जवळ असणारा झुलता पूल देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. 200 मीटर लांबीच्या या झुलता पुलावरून चालताना एक वेगळा आनंद पर्यटकांना मिळतो.
धबधब्याच्या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र असून भारतातील ते पाहिले विद्युत निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाते. 1887 साली हे विद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
बेळगाव शहरापासून हा धबधबा 70 किलोमिटर अंतरावर असून तेथे जाण्यासाठी बेळगाव येथून बस आणि रेल्वेची सुविधा आहे.