अंबांनींच्या पाया पडले, अनंत-राधिकाची मस्करी, गिरीश महाजनांचा शपथविधी सोहळ्यातील फोटो व्हायरल

महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत, उद्योगपती, बॉलीवूड तारे-तारका आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांची 2019मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले.

या शपथविधी सोहळ्याला अनेक प्रसिद्ध उद्योगपतींनी हजेरी लावली होती. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती असलेले मुकेश अंबानी या सोहळ्याला हजर होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट हेदेखील हजर होते.
अंबानी कुटुंबीय आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात आल्यानंतर भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
गिरीश महाजन हे अंबानी कुटुंबीयांशी अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे अत्यंत सलगीने वागत होते. गिरीश महाजन आणि अंबानी कुटुंबीयांच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडीओत गिरीश महाजन हे मुकेश अंबानी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
गिरीश महाजन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचीही विचारपूस केली. यावेळी गिरीश महाजन अनंत अंबानी यांच्याशी थट्टामस्करी करताना दिसले.
अनंत अंबानीही एखाद्या आपेष्टाप्रमाणे गिरीश महाजनांशी मनमोकळेपणाने हास्यविनोद करताना दिसले.