Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? जेव्हा गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या
Gautami Patil Photo : नृत्यांगणा गौतमी पाटीलने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil Latest Photo
1/9
गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.
2/9
गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे.
3/9
गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.
4/9
गौतमी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
5/9
गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
6/9
गौतमी पाटील तिच्या लावणीवरील नृत्यासाठी प्रसिद्ध असून एका कार्यक्रमासाठी लाखो रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.
7/9
काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती.
8/9
त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.
9/9
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.
Published at : 15 Sep 2023 11:49 PM (IST)