Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कल्याणचा कचरा प्रश्न अधोरेखित
सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे दिवस आहेत. घरोघरी गणपची विराजमान झाले आहेत. या निमित्ताने प्रत्येक गणेशभक्ताच्या घरचा देखावा पाहण्यासारखा असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
असाच सामाजिक संदेश कल्याणमधील अमित बाळापूरकर यांनी देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे.
या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची 'शून्य कचरा मोहीम' दाखविण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली मधील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. या प्रश्नावर तोडगा म्हणून महानगरपालिकेने शून्य कचरा मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
ही मोहीम कौतुकास्पद असली तरी अजूनही यशस्वी झालेली नाही असे म्हणायला हरकत नाही.
पण, या अपयशाला प्रशासनासोबत शहराचे सुजाण नागरिकही जबाबदार आहेत का याचा विचार करायची गरज आहे.
गणपती सजावटीच्या माध्यमातून या मुद्द्यावर प्रकाश टाकायचा एक छोटासा प्रयत्न कल्याणमधील रहिवासी अमित बाळापूरकर यांनी केला आहे.