In Pics : तहसीलदार धीरज मांजरे यांचं निसर्ग प्रेम, रानफुलांचा अनमोल ठेवा मोबाईलमध्ये कैद
वर्षा ऋतूत उगवलेल्या 66 प्रकारच्या रानफुलांचे सुंदर फोटो वाशीमच्या कारंजा येथे कार्यरत असलेले तहसीलदार धीरज मांजरे यांनी मोबाईलमध्ये कैद केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिच्या कारंजा येथे दोन वर्षापूर्वी कारंजा तहसिलदार म्हणून धीरज मांजरे यांनी पदभार सांभाळला
आपल्या कामाबरोबर प्रशासकीय चौकटीबाहेर जाऊन एखादी गोष्ट करण्याचा छंद त्यांनी कायम जोपासला.
पावसाळ्यात उगवलेल्या विविध फुलांची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
सर्व रानफुलांची ओळख त्यांना नव्हती. त्यासाठी त्यांना कारंजा येथील प्राचार्य डॉ. दत्ता हळवे व प्रा. अशोक देवरे यांनी कॅमेरात कैद केलेल्या 66 फुलांच्या प्रजातीची बोली भाषेतील नावे मिळवली.
काटेरी बाभळी झिनिया,रानझेंडू, पिवळीरानवांगी,राजमुग, काचमांडा, लाजवंती,कंबरमोडी, सब्जा, जाई जुई या सह झाडांच्या रंगेबीरंगी फुले कैद केली आहे.