PHOTO : दोन दिवसात राज्यातील चार मंत्र्यांसह 'या' महत्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. त्यांच्या कुटुंबातील 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री राजेंद्र शिंगणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे, त्यांनी म्हटलंय की, मला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दर गुरुवारी आयोजित 'जनता दरबारास' उद्या मी उपस्थित राहू शकणार नाही. कृपया जनतेने याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती!
राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
भाजप खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत माहिती देताना म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -