Chiplun's Parashuram Ghat: चिपळूणच्या परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास; ड्रोननं टिपलेली दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडेल!
आपण या दृश्यात पाहतोय तो मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट..नागमोडी वळणाचा हा घाट.. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गेले काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे..त्यात या घाटाचे काम चार वर्षे रखडलेले..जमीनीच्या मोबदल्याच्या वादामुळे काम रखडले..या घाटाच्या खालच्या बाजूला वाशिष्टी वाहते..आणि तीच्या काठावर वसलेली वस्ती.. तर दुसऱ्या म्हणजेच घाटाच्या वरच्या बाजूला भगवान परशुरामाचे मंदीर आणि वस्ती..या दोघांच्या मधून हा घाट.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआणि त्यातूनच मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास..इथे असणाऱ्या गावकऱ्यांच्या जमीनी मोबदल्याच्या वाद शेवटी कोर्टात गेला आणि त्यावर कोर्टाने सबंधित ठेकेदार कंपनीला घाटाचे काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश दिले..आणि त्यानुसार कामाला सुरुवातही झाली..गेल्या महिन्यात घाटाचे काम सुरु असतांना कापलेल्या डोंगराचा काही भाग खाली सरकला..माती दगड गोठे खाली आल्याने काम करत असलेल्या यंत्रावर अचानक आल्याने तीन मशीन या मातीच्या ढिगाऱ्या खाली गेल्या त्यात एका मशीन चालकाला जीवही गमवावा लागला.. कोसळलेली,अडकलेल्या मशीन माती आजवर तश्याच आहेत..
पण डोंगराच्या मातीला चिकटपणा नसल्याने माती हळूहळू खाली सरकायला लागली आहे.. शिवाय सरकलेल्या मातीला कोणतीही सेफ्टी वॉल अध्यापर्यत घातलेली नसल्यामुळे हिते सध्या प्रवाश्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे.. रुंदीकरणाचे काम येणाऱ्या पावसाळ्यापुर्वी पूर्ण झाले नाही तर या महामार्गावरून प्रवास करतांना कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांना याचा फटका बसू शकतो.. तर प्रशासनाला वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.. सध्या सुरु असलेल्या कामामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतोय..
नागमोडी वळणाचा घाट असल्यानें काही अवघड वळणे धोक्याची आहेत..त्यात डोंगर कापल्याने माती रस्त्यावर आली आहे..याला अध्याप कोणतीही सेफ्टी वॉल टाकण्यात आलेली नाही..
तर या ऐतिहासिक डोंगरातून पुर्वी काढलेला महामार्ग आणि डोंगरावर वसलेली वस्ती ला आता धोक्याची घंटा निर्माण झाली आहे..डोंगर कापल्याने हळूहळू डोंगराचा काही भाग सरकत आहे..कोकणात धोधो कोसळणारा पाऊस आणि त्यात रुंदीकरणाचे राहिलेले अर्धवट कामे याचा फटका तेथील रहिवाश्यांना बसू शकेल..असा अंदाज स्थानिकांकडून वर्तवला जातोय.. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटाचा काही भाग ढासळल्यामुळे हा घाट काही दिवस वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता..
सध्या कोकणातील मोठा उत्सव मानला जाणारा शिमगोत्सव तोंडावर आला आहे..या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्यासंख्येने कोकणात दाखल होतात..तळकोकणात जाण्यासाठी चाकरमानी,मुंबईकर जास्तीतजास्त याच महामार्गावरून प्रवास करतात..त्यामुळे धोकादायक घाटातून रात्रीचा प्रवास करतांना तेथे सुरक्षेतीच्या दृष्टीने सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे.. अशी स्थानिकांची मागणी आहे..
तिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वाशिष्टीनदीवरील पुलाचा काही भाग ढासळल्यामुळे..नवीन फुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले..आणि पुल कमी कालावधीत पुर्ण करून त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली.
आता या पुलावरील ओतलेले सिमेंट कॉंक्रेट काही ठिकाणी निघत चालले आहे..त्याबाजूला दुसऱ्या नविन पुलाचे काम सुरु आहे..तोही पूल पुर्ण होऊन त्याच्यावरुन वाहतूक सुरु झाल्यास पुलावरून वाहतूकीचा खोळंबा कमी प्रमाणात होईल..
तुम्हीच ठरवा या घाटातून जीवघेणा प्रवास करायचा कि नाही.. हि दृष्य ड्रोन च्या माध्यमातून टिपलेत माझाचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..