Maharashtra : सुटाबुटातल्या देवेंद्र फडणवीसांकडून दावोसमध्ये धडाधड करार, महाराष्ट्रासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणली
दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6 लाख 25 हजार 457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघ्या एका दिवसात इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे.
दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपनी प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची भेट घेतली. टाटा समूह महाराष्ट्रात तीस हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे.
जेकब अरुप अँडरसन, काल्सबर्ग समूहाचे सीईओची यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रमध्ये गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली आहे, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
रिटेल क्षेत्रात कार्यरत असलेले लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम. ए. युसुफ अली यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
बीड जिल्ह्यात 15,000 मे.वॉ. पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा आणि देवेंद्र फडणवीसोबत चर्चा झाली.
शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे सीईओ दीपक शर्मा यांचासोबत ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.
मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांची लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंसोबत चर्चा झाली.