Weather : आज आणि उद्या राज्यात पावसाचा अंदाज
राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. मात्र, थंडी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. या बदलत्या तापमानाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत
थंडीनंतर राज्यात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकण आणि विदर्भात थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान विभागानं सांगितलं आहे.
मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील 7 अशा 17 जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
आज आणि उद्या काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा प्रवाभ कमी होण्याची शक्यता आहे.
बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे.
, मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील 7 अशा 17 जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.