Shivrajyabhishek 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला महाल परिसर
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवतीर्थ महाल येथे रविवारी तिथीनूसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी 7 वाजता शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत महाराजांना मानवंदना दिली.
शिवराज्याभिषेक सोहळा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली महाल परिसर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला.
सोहळ्यात हजारोंच्या संख्येत शिवप्रेमींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे 11 वे वंशज संदेश देशपांडे, निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपुरातील आखाड्यांनी चित्तथरारक शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली.