Shivpratap Din 2021 : प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा, शिवप्रेमींना येण्यास बंदी घातल्यानं नाराजी

छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या दिवसामधील एक दिवस म्हणजे प्रतापगडावरील अफजल खानाचा केलेला वध.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज या दिवसाला 353 वर्ष पूर्ण होत आहेत.

यानिमित्ताने गडावरती प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवप्रताप दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात गडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात.
मात्र कोरोना आणि नव्याने आलेला व्हेरिएन्ट ओमीक्राॕनच्या भिती मुळे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे गडावरती शिवप्रेमिंना बंदी घालण्यात आली.
तर 144 कलम हे दाखल करण्यात आले होते.
त्यामुळे साध्यापध्दतीने गडावरचा हा उत्सव शासकीय यंत्रनेणे पारा पाडला.
नेहमीप्रमाणे सकाळी गडावरील देवीच्या मंदिरात प्रथम पुजा त करण्यात आली.
काहीवेळातच गडावरच्या शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक मंदिरातून निघाली.
नंतर गडावर असलेल्या अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
यंदाच्या शिवप्रताप दिनानिमित्त मात्र कोणताही ढोल ताशा लावण्यात आला नव्हता.
तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली नाही.
जरी शिवप्रेमींना या ठिकाणी येण्यास मज्जाव केलेला असला तरी प्रशासकीय यंत्रणेने मात्र हा उत्सव चांगला पार पाडला.