Shivrajyabhishek Din 2021 : किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा, पाहा फोटो
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिल्ले रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे. त्यातच, यंदा देखील कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा होणारा राज्याभिषेक सोहळा हा मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच साजरा करावा लागला आहे.
आज किल्ले रायगडावर तिथीनुसार साजरा होणारा 348 वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळेस, सकाळी किल्ले रायगडावर धुक्याची चादर पसरल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर, किल्ले रायगडच्या भोवतालचा संपूर्ण परिसर , सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर धुक्याची दाट चादर पसरली होती.
दरम्यान, सकाळच्या सुमारास शिरकाई देवीचे पूजन करून शिवपालखीचे राजदरबारात आगमन झाले. त्यानंतर, शिवरायांच्या मूर्तीचे शास्त्रोक्त पूजन करून मंत्रोच्चाराच्या जल्लोषात अभिषेक करण्यात आला. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत जयघोष करण्यात आला.
मेघडंबरी तसेच होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान, तिथीनुसार शिवराज्याभिषेकासाठी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पाच लाखांचा निधी दिला असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
दोन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे साजरा होणारा 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याने शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी, राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी राजदरबार ते शिवसमाधी दरम्यान पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे.