PHOTO : बुलढाण्यातील जगावेगळा 'क्वीन नेकलेस'! पर्यटकांची तुफान गर्दी, काय आहे खासियत
पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळं खुलून निघतात. त्यातल्या त्यात पाण्याने भरलेली धरणे ही पावसाळी पर्यटकांची एक आकर्षणाची गोष्ट असते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातील 'क्वीन नेकलेस' अशी ओळख असलेलं धरण देखील पर्यटकांनी खुलुन गेलं आहे. सध्या सोशल मीडियात ट्रेंडिंग होत असलेल्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगची आठवण आपल्याला बुलढाण्यातील या धरणावर गेल्यावर होईल.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Buldhana Mehkar) तालुक्यातील डोंगर दऱ्यांच्या खाली देऊळगाव साकरशा गावाजवळ असलेलं उतावळी नदीवरील उतावळी धरण.
या धरणाला 'क्वीन नेकलेस' असंही म्हटलं जातं. याचं कारण आहे ते धरणाच्या सांडव्याची अनोखी रचना.
अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा. त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी. यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी असा दिसणारा हा सांडवा.
आता यावर्षी हे धरणं जुलै महिन्यातच पूर्ण भरलं आहे.
या धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात पण या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर बांधण्यात आला आहे. मध्यम प्रकल्प म्हणून गणला जाणाऱ्या या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची मोठी म्हणजे 370.50 दशलक्ष घन मिटर इतकी आहे. विशाल अशा डोंगरदऱ्यात हे धरण बांधायला सुरुवात झाली ती 1997 साली. तर या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं 2004 ला. कालच हे धरण 100% भरल्याने आता सांडव्यावरून पाणी वाहत आहे. आता या धरणाचं पर्यटन महत्व वाढल्याने दुरून पर्यटक या क्वीन्स नेकलेसला बघायला येत आहेत.
आता धरण आणि पाणी म्हटलं की रिस्क आलीच. म्हणून या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं ही महत्वाची आहे. कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी, पर्यटनाला जाताना योग्य ती खबरदारी घेऊन धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन ही येथील स्थानिक नागरिक करतानाही दिसतात.
बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक , ऐतिहासिक , नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.
आता उतावळी धरणं अर्थात क्वीन्स नेकलेस हे सुद्धा नवीन पर्यटनस्थळ नावारूपास येत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळत आहे.