Bharat Jodo Yatra: राहुल गांधींचा वणाळीत मुक्काम, गुरूनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शन
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील वणाळी येथे मुक्कामाला असलेल्या राहुल गांधी यांनी काल तिथल्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.
गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते गुरुद्वारामध्ये पोहोचले.
रात्री अडीच वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्या वतीनं गुरुद्वारामध्ये पूजा पाठ करण्यात आले.
आज नांदेडमधील देगलुरच्या वणाळी गावातील बाबा फतेह सिंह गुरुद्वारामधून पदयात्रा पुढे निघत आहे
काल रात्री भारत जोडो यात्रा देगलुरमध्ये दाखल झाली तेव्हा हजारो कार्यकर्त्यांनी मशाल घेऊन यात्रेचं स्वागत केलं.
देगलूर ते वन्नाळी रस्त्यावर एकतेची मशाल घेऊन निघालेल्या यात्रेला नंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलं.
या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत कुणीही रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.
राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.