Bakra Eid 2023 : बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करुन ईद साजरी करतात...
यंदा 29 जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद (Bakra Eid) हा सण साजरा केला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे.
रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. याच सणाला ईद-उल-जुहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे.
मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व समजले जाते. या दिवशी रमजान ईद प्रमाणे सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात.
सोबतच या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम समाजात बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. ज्याला बकरी ईद म्हणतात. सौदी अरबमध्ये उंट आणि मेंढा यांची कुर्बानी देण्यात येते.
विशेष म्हणजे यासाठी घेण्यात येणारा प्राणी कष्टाच्या पैशांनी घेण्यात यावा, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने कमवलेल्या पैश्यातून घेतलेला नसावा. त्यानंतरच कुर्बानी मान्य होते. पण कुर्बानीचा देखील एक इतिहास आहे.
कुराणमध्ये असलेल्या उल्लेखानुसार इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम यांचा उल्लेख करण्यात येतो. तसेच मुस्लिम धर्मात हजरत इब्राहिम यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली.
बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात.
मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व समजले जाते.