Bailpola : जिवा-शिवाची बैल जोड... गावाकडं बैलपोळा साजरा, बालपणीच्या आठवणीत रमले शहरवासी
राज्यभरात आज बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मात्र मराठवाड्यात यंदा पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबैलपोळा सण हा ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परंपरेचा उत्सव आहे. गावखेड्यात शेतातील बैलांची पूजा करुन, त्यांना नवैद्य देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही आपल्या गावाकडे शेतात जाऊन बैलांची पूजा केली, बैलपोळा सण गावाकडील माणसांसोबत राहून साजरा केला.
राज्यातील गावागावात बैलपोळा साजरा होत असून बैलजोडी घरी आणून त्यांची पूजा केली जाते, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रति प्रेम आणि आपुलकी दाखवायचा आजचा दिवस आहे
ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा होत आहे. मात्र, आता बहुतांश शेतकरी प्रगतशील झाल्याने त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि इतर सामुग्री आली आहे.
आधुनिकीकरणाच्या युगात बैलांपासून शेतकरीही दूर जात आहे. पण, आजही गावकडं बैलपोळा सण तितक्यात आपुलकीने आणि प्रेमभावनेतून साजरा केला जातो
बैलपोळा सणाच्या आठवणी जागवत गावाकडची मंडळी आज शहरातील गर्दी बैलपोळा सण शोधण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात
मराठवाड्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नद्यांना पाणी आले आहे आणि या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना कुठेतरी पोळा साजरा करताना अडचणी येत आहेत
मात्र, पावसाची अडचण दूर करत वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढून हा सण साजरा केला जात आहे. जिवा शिवाजी बैल जोड म्हणत बैलांची मिरवणूक निघतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
माजी मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही आपल्या मूळ गावी बैलपोळा साजरा केला. यावेळी, बैलांची मोठी सजावट केल्याचं दिसून आलं