Bail Pola Special : 'सर्जा-राजा'कडूनही कोरोना जनजागृती, पोळ्यानिमित्त बैलांची खास सजावट, दिला अनोखा संदेश
Bail Pola Festival 2021: श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. आदल्या दिवशी खांदंमळणी केली झाले. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. झुल चढवली जाते. गळ्यात चंगाळी, शिंगाना रंगवलं जातं.
महाराष्ट्रात सगळीकडे बैलपोळा सणाचा उत्साह दिसून येतोय. बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम कापसे यांनी बैलपोळ्यानिमित्त कोरोनाबाबत जनजागृती केलीय.
बैलाच्या पाठीवरून संदेश देत कोरोनाचे नियम पाळा तिसरी लाट टाळा, लस घ्या कोरोना टाळा, गो कोरोनाचा संदेश देण्यात आलाय.
यंदा कोरोनामुळे बैलांची मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला जातोय. उत्तम कापसे यांनी त्यांच्या सोन्या आणि शिल्या या बैलांवर केलेली रंगरंगोटी लक्ष वेधून घेत आहे.