औरंगाबादच्या लेबर कॉलनीतील शेकडो घरं पाडली;निवारा नसलेल्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
औरंगाबादच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी साडेसहापासून ही पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरु झालीय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी 338 घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलीस आणि दीडशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
या पाडकाम कारवाईसाठी 50 जेसीबीसह अनेक कामगारांना पाचारण करण्यात आलं आहे. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडला आहे.
तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र तरीही काही नागरिक इथं राहत असून त्यांनी या पाडकामाला विरोध केला आहे.
ही मोडकळीस आलेली घरं पाडताना काही गोंधळ सदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे.
आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी सहापासूनच ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.
लेबर कॉलनीमध्ये घर पडलेल्या ज्या लोकांना खरंच घरे नाहीत, त्यांना दुसरा पर्याय नाही त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.
पुर्नवसन करणाऱ्या लोकांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलीय
औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी इथं 20 एकर सरकारी जागेवर 1953 मध्ये शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली होती.