Ashadhi Wari 2023 : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अश्व देहूच्या वाटेवर
जून महिना हा जसा पावसाच्या आगमनाचा तसा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीचा..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगवेगळ्या संताच्या तसंच देवस्थानाच्या पालख्या हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं एक अद्वितीय वैशिष्ट्य.. गावोगावी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांची लगबग सुरु आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 10 जूनला प्रस्थान होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देवाचा मानाचा अश्व देहूकडे रवाना झाला आहे
आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वैष्णव भक्त देहु-आळंदी वरुन पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी देहभान विसरून हरिनामाच गजर करत ऊन, वारा, पाऊस झेलत पायी वारी करतात.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाभुळगाव येथील पालखी सोहळ्याचे चोपदार हभप निवृत्ती महाराज गिराम यांचा मानाचा देवाचा अश्व आहे.
या अश्वासह वारकरी देहुकडे पायी निघले आहे. हा अश्व आज इंदापूर तालुक्यातून जात आहे. भाविक या अश्वाची पुजा करतायेत.
हा मानाचा अश्व पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असतो. रिंगणात धावतो.
आम्ही दरवर्षी पंढरपूरहुन देहुकडे पायी जातो व परत पायीच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरकडे अश्वाला घेऊन जात असतो.