Ashadhi Wari : येळकोट येळकोट जय मल्हार... भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत
सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज जेजुरीत पोहचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा आणि खोबरे उधळून मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आला.
पालखी जेजुरीत पोहचताच येळकोट, येळकोट जय मल्हार... असा जयघोष झाला. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी विसावली. उद्या सकाळी वाल्हे येथे मार्गस्थ होणार आहे.
जेजुरी नगरीमध्ये सकाळ पासूनच वारकर्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी, राहण्याच्या व्यवस्थेसाठी जेजुरीतील अबालवृद्ध झटत असतात.
जेजुरीला भक्ताची कधीच वाणवा नाही. कारण वर्षभर या ना त्या कारणाने कायम जेजुरी खंडोबा भक्तांनी गजबजलेली असते.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकीची वारी करणारे वारकरी कधीच आपली वारी चुकू देत नाहीत.
तसेच वर्षातून दोन वेळा मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाला भेटण्यासाठी सोमवती अमावस्येला राज्य आणि राज्याबाहेरून भक्त जेजुरीत येत असतात..
माऊलीच्या पालखीवर भंडारा उधळला गेल्यानंतर माऊलीची पालखी पिवळी होताना पाहायला पंचक्रोशीतील अबालवृद्ध या पालखी मार्गावर जमा झाले होते.
माऊली महाराजांची पालखी जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी आजचा या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.
दोन वर्षांनंतर पायी यात्रा सुरू झाल्यापासून लाखो वारकरी दोन्ही पालखीत सामील झाले आहेत.
दोन वर्ष पंढरीची आस लागलेले वारकरी यंदा पांडुरंगाच्या दारी जाणार आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यार उत्साह आहे.