Ashadhi Wari : रुक्मिणी मातेच्या पालखीचं सासरी पंढरपूरला प्रस्थान, मंत्री यशोमती ठाकूर यांनी धरला ठेका
Ashadhi Wari 2022 : विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीचं माहेर कौंडण्यपूर ओळखलं जातं.
आषाढी एकादशीला दरवर्षी रुख्मिणी मातेच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात.
427 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे.
कोरोनानंतर प्रथमच शुक्रवारी दुपारी 3 वाजता पायदळी पालखी काढण्यात आली.
10 मानाच्या पालख्यांपैकी विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची माहेरची पालखी आहे.
टाळ मृदंग, वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन आणि श्री नामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी झाले
यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचे पूजन केले.
आपल्या खांद्यावर पालखी घेऊन पालखीला पंढरपूरकडे रवाना केली,
वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेरही धरला होता.
कोरोना सावटाखाली दोन वर्षे मानाची पालखी म्हणून मोजक्या वारकऱ्यांच्या सहभागाने पंढरपूरला गेलेल्या या पालखीमध्ये पहिल्यांदाच सर्व वारकरी बांधव बहुसंख्येने सहभागी झाले.