Ashadhi Wari : 'लागली पंढरीची आस'; संत तुकारामांची पालखी निघाली पंढरीकडे, वारकऱ्यांमध्ये उत्साह

टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह यावेळी होता.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर झाले आहेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत.
आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून गेली. देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली.
आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते.
ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहूत दाखल झाले
दोन वर्ष पंढरीची आस लागलेले वारकरी यंदा पांडुरंगाच्या दारी जाणार आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यार उत्साह आहे.