Ashadhi Ekadashi 2021 : 16 विटा, 16 रुप; चित्रकार अक्षय मेस्त्रीने रेखाटली विठ्ठलाची मनमोहक चित्रे
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी याला एक मोठी परंपरा आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून वारकऱ्यांना पायी वारी करता येत नाही आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी पांडुरंगाची वेगवेगळ्या रुपातली 16 चित्र विटेवर साकारत वारकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार अक्षय मेस्त्रीची आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 16 विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचे मनमोहक चित्र रेखाटले आहे. वैशिष्ट्य पूर्ण पांडुरंगाची साजरी गोजरी विटेवरील चित्र देवगडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
चित्रकलेतून अक्षय मेस्त्री नेहमी नेहमी सामाजिक, पौराणिक, कलात्मक गुणांची चित्रातून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.
एकाच ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या वेषभूषेतील पांडुरंग कोकणवासीयांना पाहता येत आहेत. विटेवर साकारलेली ही चित्रे प्रदर्शनात मांडण्याचा मानस अक्षय मेस्त्री याचा आहे.
मागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, साकारलं होत.