PHOTO : अण्णा नाईक झाले फिदा, शेवंतावर नाही, मग नक्की कोणावर?
रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक म्हणजेच, अभिनेते माधव अभ्यंकर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. पण यंदा शेवंता नाहीतर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोलीला भेट दिली. जैवविविधतेणे संपन्न आणि निसर्गाची मुक्तहस्तानं उधळण केलेल्या आंबोलीत त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला.
आंबोलीपासून जवळ असलेल्या बाबा धबधब्यावर अण्णा नाईक यांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.
अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या पत्नीनंही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा भरपेट आंनद घेतला.
माधव अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नीनं शेतात उतरून लावणीसुद्धा केली.
माधव नाईक इथल्या निसर्ग संपन्न आंबोलीच्या प्रेमात पडले. अण्णांना आंबोली एवढी भावली की, त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.
नॅचरल ऑक्सिजन घेण्यासाठी आंबोलीत एकदा तरी भेट द्या आणि रिफ्रेश व्हा, असं पर्यटकांना अण्णा नाईक यांनी आवाहन केलं आहे.