भीषण! ऊसतोड मजूरांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची जोरदार धडक, बार्शी- लातूर बायपासवर 12 मजूर जखमी, लहान मुले, महिलांचाही समावेश

बार्शी-लातूर बायपासवर शनिवारी संध्याकाळी ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या भीषण अपघातात 7 लहान मुले, 3 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 12 मजूर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात चौघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
ऊसतोडीच्या कामासाठी मजूर ट्रॅक्टरने प्रवास करत असताना ट्रकने मागून जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बार्शीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे