Photo : 'माझा दिवाळी अंक' वाचकांच्या भेटीला, दिग्गजांनी केलं स्वागत

पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक दाखल झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं. जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद पै यांच्या हस्ते माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं.

ग्रंथाली प्रकाशनाच्या प्रतिभांगणात हा कार्यक्रम पार पडला.
एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी यावेळी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली.
एबीपी माझाच्या दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सहकार्य लाभलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी माझाच्या दिवाळी अंकात लेखन केली आहे.
शेतातून दिसणारे सहा ऋतू प्रवीण तरडे याने दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहेत.
दिग्गज कथाकार राजेंद्र बनहट्टी, भारत सासणे, मिलिंद बोकील यांच्या बरोबरच समीर कुलकर्णी आणि प्राजक्त देशमुख अशा ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या लेखकांच्या कथा अंकात समाविष्ट आहेत.
वसंत गुर्जर, दासू वैद्य, संजय कृष्णाजी पाटील, सौमित्र, संदीप खरे, प्रफुल्ल शिलेदार, किरण येले आणि श्रीराम गोविंद गव्हाणे यांच्या कविता या अंकाची श्रीमंती वाढवणाऱ्या आहेत.