Aashadhi Wari : आज आषाढी वारी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे.
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.
आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन आहेत.
आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये पुजा करण्यात आली.
. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.
बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी केलं.
मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.