PHOTO: दारुचा महापूर! सोलापुरात 5 हजार लीटर हातभट्टी जप्त, लाखोंचा मुद्देमाल पकडला
सोलापूरमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5 हजार लीटर हातभट्टी दारु पकडण्यात आलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून हातभट्टी दारु हस्तगत करण्यात आलीय.
सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडाकेबाज कारवाई केलीय.
यामध्ये एकूण 3 लाख 60 हजाराचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय.
सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात छापा टाकला.
यामध्ये तब्बल 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू आणि 1 टन 110 किलो गुळ पावडर आढळून आली.
तसेच या ठिकाणावरुन 4 रिकामे प्लास्टिक बॅरल, 20 रिकाम्या रबरी ट्यूब, 1 मोबाईल, 1 मोटरसायकल असा एकूण 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी भिमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली आहे.
त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.