Latur Hail Storm : लातुरात गारपिटीचा परिणाम, काळे शिवार झाले पांढरे!
लातूर जिल्ह्यातील रेणापूर, पानगाव, टाकळगाव, मोहगावतळणी गावाच्या शिवारात आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया गावांमध्ये अर्धा तास गारांचा तुफान पाऊस झाला. गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं.
गारांचा आकार हा लिंबा एवढा होता. घरावरील पत्रेच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
भागात अनेक ठिकाणी गराचा खच दिसून येत होता. परिणामी काळे शिवार पांढरे झाले आहे.
वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे सर्वत्र थंड वारे वाहत आहेत
सततच्या पाऊस आणि वाऱ्यामुळे काढणीला आलेली गहू ज्वारी हरभरा आणि करडी सारखी पिके हाताची गेली आहेत.
याच भागामध्ये द्राक्षाच्या मोठ्या बागा आणि केशर आंब्याच्या बागा आहेत. या भागांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
काल मध्यरात्रीपासून निलंगा आणि निलंगाच्या आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता मात्र पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली होती
आता दिवसा लातूर ग्रामीण भागातील अनेक गावात गारपीट झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.