MC Stan : बजरंग दलाकडून एमसी स्टॅनला मारहाण? लाईव्ह शो पाडला बंद
'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे.
आता रॅपरच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाकडून मारहाण करत त्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे.
17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे इंदूरमध्ये आयोजन करण्यात आले होते.
एमसी स्टॅन त्याच्या गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला.
एमसी स्टॅनचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत.
'पब्लिक स्टॅंड्स विथ एमसी स्टॅन' हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे.
आज 18 मार्चला नागपुरात एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.
पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यामुळे एमसी स्टॅनचा आजचा नागपुरातील शो रद्द होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.