Latur News : लातूरमध्ये बँक कर्मचाऱ्यांच कँडल मार्च, राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लाख पदे तात्काळ भरण्याची मागण
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये दोन लाख पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त आहेत. या जागा तात्काळ भराव्यात या मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकायमस्वरूपी नोकर भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सरकार काम करून घेत आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसत असल्याचं सांगण्यात येतंय.
बँकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी लातूर शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज संपल्यानंतर कॅन्डल मार्च काढला.
या मागचं मुख्य कारण होते राष्ट्रीयकृत बँकेत दोन लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. शिपाई आणि क्लरक पदाच्या रिक्त जागा आहेत.
मागील अनेक वर्षापासून या जागा सरकार भरत नाहीये. त्या ठिकाणी नऊ ते दहा हजार रुपये वर काम करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये.
दोन लाख पदे रिक्त ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करून हा नफा कमवला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय?
देशातील बेरोजगारीचे प्रमाण 10.40 टक्के आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मागील दहा वर्षात कधी नव्हे एवढा नफा कमवलेला आहे.
स्थिती स्पष्ट असताना मग सरकार दोन लाख लोकांना कायमची नोकरी का देत नाही? असे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलनाची भूमिका घेत असल्याचं स्पष्टीकरण आंदोलकांनी दिलं.