Latur News: लातूर जिल्ह्यात गणरायाचे जल्लोष आगमन, हेलिकॉप्टरमधून गणरायावर पुष्पवृष्टी
घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तरुणांचा ओढा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे दिसून आला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी चारनंतर मानाच्या गणेश मंडळात गजाननाच्या आगमनासाठी लगबग पाहायला मिळाली.
अनेक मंडळाने यावर्षी भव्य आणि आकर्षक गणेश मूर्तीचे देखावे तयार केले आहेत.
संकल्प प्रतिष्ठान संचलित विश्वाचा राजा गणपती मंडळ गणरायाचे आगमन अतिशय थाटात आणि जल्लोषात झालं.
गणपतीच्या आगमनाबरोबरच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती आल्यानंतर अनेक क्रेनमधून गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
लातूरमधील मोठी आणि नावाजलेल्या गणेश मंडळाचे गणेश मूर्तीचे आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर जल्लोषात स्वागत झाले
यावेळी ढोल ताशाचा गजर आणि डीजेच्य तालावर तरुणाईने बेधुंद होत ठेका धरला होता. अनेक पारंपारिक वाद्य पथक यावेळी यात सहभागी झालेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शहरातील सर्व मोठा गणेश मंडळाचे आगमन झालेलं पाहायला मिळालं.
या सर्व जल्लोषाची ही काही क्षणचित्रे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली आहेत