'करा योग, रहा निरोग' : योगदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात योगाची प्रात्यक्षिके
दैनंदिन ताणतणाव दूर ठेवून निरोगी जीवनासाठी नियमित योगासने करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'करा योग, रहा निरोग' असा मूलमंत्र जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने योग पटूंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगा प्रात्यक्षिके केली.
यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी योगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी योगाचे महत्त्व विशद केले.
आपले स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे. योगा हा केवळ योग दिनापूरता मर्यादित न राहता नियमितपणे करा,असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांना 'फिट इंडिया' प्रतिज्ञा देण्यात आली.
तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य भित्तीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील बाल योगपटूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर कॉमन योगा प्रोटोकॉलमधील विविध योगासने उपस्थितांनी केली.