New BJP Office In Kolhapur: कोल्हापुरातील नव्या भाजप कार्यालयाचा आज वास्तू प्रवेश सोहळा
कोल्हापूर भाजपकडून नवीन कार्यालय बांधण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पिटल मार्गावर नूतन कार्यालयाची इमारत बांधली आहे.
या कार्यालयात भाजपचा आज (28 मे) कार्यालय वास्तू प्रवेश सोहळा होणार आहे.
नव्या कार्यालयात रात्री स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यालयातून भाजपच्या जिल्हा कार्यकारणीचे कामकाज होईल.
संघटनात्मक, सेवात्मक व लोकाभिमुक कार्य या नव्या कार्यालयातून व्हावे, असे कोल्हापूर भाजपने म्हटले आहे.
लोकांना या कार्यालयाची माहिती व्हावी, यासाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते इमारतीच्या परिसरातील गणपती मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती.
फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम पार पडला होता. या ठिकाणी रॅलीही आयोजित करण्यात आली होती.
कोल्हापुरात भाजपकडून लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी जय्यत तयारी सुरु आहे. दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.