Kolhapur News : कोल्हापुरातील दसरा चौकात शिक्षकांचे शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन, चौकाचे चारही मार्ग रोखले
कोल्हापूरच्या दसरा चौकात विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षक आंदोलने करत आहेत.
सरकारने मागण्या मान्य न केल्याने दसरा चौकाचे चारही मार्ग शिक्षकांनी रोखले.
आंदोलनामध्ये शिक्षिकांचा देखील मोठ्या सहभाग होता.
वाढीव टप्पा अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध माध्यमातून कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे.
कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये एक ऑगस्टपासून अशंत: विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन पुकारलं होतं.
मात्र, शासनाने याची दखल घेतली नसल्याने शेवटी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वाढीव टप्पा अनुदानाचा जीआर काढण्यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत.
शिक्षकांना वाढीव टप्यानुसार अनुदान देणार नसाल, तर शेवटी आमच्या येथून तिरढ्या उचलाव्या लागतील असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला होता.
राज्य सरकारने जून 2024 पासून वाढीव 20 टक्के टप्पा दिला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, सदर घोषणेचा आदेश शासन निर्णय अद्याप करण्यात आलेला नाही.