Sumangalam Lokotsav : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा : उद्योगमंत्री उदय सामंत

जगाला खऱ्या अर्थाने बदलण्याची शक्ती सिद्धगिरी मठावर एकटवली असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजच्या काळात जर समाजासाठी जर काम करायचे असेल पर्यावरणावर काम करणे गरजेचं असल्याचे म्हणाले.

वसुंधरा टिकली तरच मानव जातीची पुढील वाटचाल होईल, त्यामुळे खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय यंत्रणा म्हणून कार्य करताना खूप मर्यादा पडतात, पण पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचे कार्य भव्य तर आहेच पण खऱ्या अर्थाने अमर्यादित असल्याचे सामंत म्हणाले.
समाजाचे परिवर्तन करण्याची देशातील सर्व सृजन शक्ती स्वामीजींनी सिद्धगिरी मठावर सुमंगलम या कार्यक्रमाच्या रूपाने एकत्रित केली असल्याचे ते म्हणाले.
ही शक्ती निश्चित समजाला दिशा देणारे महान कार्य करेल, त्या कार्यात शासन नक्कीच कटीबद्ध राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी सर्व उद्योजकांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त उद्योजकांसाठी विशेष परिषद घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय हरीत लवादाचे अध्यक्ष ए. के. गोयल, उत्तर प्रदेशचे आमदार सी.पी. चंद, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, ट्रान्सग्नायझेशनचे संस्थापक रोहित अरोरा, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, सॅटर्डे क्लबचे नितीन देशपांडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, भैय्याजी जोशी प्रमुख उपस्थित होते