Sangli News : मिरजेत तब्बल 375 फूट तिरंगा रॅली; 'विविधता मे एकता'ची दिली हाक

सांगली जिल्ह्यातील मिरजेत तब्बल 375 फूट तिरंगा रॅली निघाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मिरजेमध्ये जिल्ह्यातील पहिलाच 100 फूट उंच तिरंगा झेंडा उभारण्यात येणार आहे.

15 ऑगस्ट रोजी याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज मिरज शहरामध्ये भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली.
यावेळी 375 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची मोठ्या दिमाखात शहरातील प्रमुख मार्गावरून ही तिरंगा रॅली निघाली.
विविधता मे एकता अशी हाक देण्यात आलेल्या तिरंग्या रॅली शहरातील नागरिकांसह शालेय विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरजेचे नगरसेवक निरंजन आवटी यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरात हा भव्य तिरंगा झेंडा उभारण्यात आला आहे.
एनसीसी विद्यार्थ्याचा सहभागही लक्षणीय होता.
यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
शहरवासियांकडून तिरंगा रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.