PHOTO: कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनात 4 दिवसात 12 कोटींची उलाढाल
कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनात 4 दिवसात 12 कोटींची उलाढाल झाली. तांदळासह अन्य धान्यांची उच्चांकी विक्री झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे पुढील भीमा कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढवणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात लाखो शेतकरी व नागरिकांनी भेट दिली. नितीन गडकरी यांनीही कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने प्रदर्शनाला भेट दिली.
महिला बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 50 लाखांची उलाढाल झाली.
शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
भीमा कृषी प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित 400 कंपन्याचा सहभाग होता. 200 महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविलेला सर्वात मोठा हरियाणातील 12 कोटींचा बादशाह रेडा आणि 31 लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण ठरली.
शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीची सोय करण्यात आली होती.
भीमा कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी डॉ. जे.बी. पाटील, सहायक प्राध्यापक यांनी सेंद्रीय शेती आणि जमीनीचे अरोग्य या विषयावर व्याख्यान दिले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रभर जीआय मानांकित असणाऱ्या उत्पादनांचे प्रदर्शन भीमा कृषी प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते.
याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस, खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरली.
चार दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटकातून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.