कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुकमधील जिल्हा कृषी प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद
कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडेत (ता.राधानगरी) आयोजित कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सवास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवारी जिल्हा कृषी महोत्सवाचे आजचे सत्र जिल्ह्यातील सरपंच आणि महिला शेतकऱ्यांसाठी समर्पित करण्यात आले.
महोत्सव स्थळापासून येळवडे, पुंगाव, शिरगाव, कौलव, भोगावती आणि परिते या गावांमधून पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यात जवळपास पाचशे दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
यावेळी पौष्टिक तृणधान्य माहितीपत्रकांचे आणि मिलेट वाटप करण्यात आले.
सरपंच आणि महिला परिषदेला आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अर्जुन आबीटकर यांनी मार्गदर्शन केले.
सरपंच संजीवनी पाटील, सरपंच विमल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रविंद्र पाठक, राज्यस्तरीय शेतकरी सल्लागार समिती सदस्य अशोक फराकटे आदींसह शेतकरी, सरपंच आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागतिक स्तरावर पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या तृणधान्यांची लागवड, उत्पादन याबाबत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प शेंडापार्क येथील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, डॉ. प्रविण मतीवडेकर यांनी पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले तर रेशीम उद्योगाबाबत समीर पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुजित हरळणकर यांनी ही मार्गदर्शन केले.
महोत्सवात एकरी साठ टन ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार प्रकाश आबिटकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनात परदेशी भाजीपाला, दहा किलोचा मुळा, साबुदाणा कंद, जनावरे, माडग्याळ जातीचा मेंढा आकर्षण आहे.