Mango : हापूसचा गोडवा सातासमुद्रापार,परदेशात मोठी मागणी
आंबा (Mango) हा फळांचा राजा आहे. त्यामध्ये कोकणातील हापूस (Hapus) हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून मागणी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता सातासमुद्रापार पोहोचलाय.
कोकणातील (Konkan) प्रमुख शहारांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे.
फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळं याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे.
कोकणातील हापूस आता साता समुद्रापार पोहोचला आहे. त्याची मागणीही इतर देशात वाढली आहे.
कोकणातील प्रमुख शहारांमध्ये हापूसला पुरेसा दर मिळाला नाही तरी आखाती देशात चांगलाच दर मिळत आहे. कोकणात सध्या कडक उन्हाळा आहे. यात हापूसचा हंगाम सुरु झाला आहे.
हापूस म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. हापूसचा गोडवा आता सातासमुद्रापार असणाऱ्यांनाही लागला आहे. कोकणात खास करुन रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे.
कोकणात अडीच लाख मेट्रीक टन उत्पादनापैकी 25 हजार मेट्रीक टन फळाची तर 10 हजार मेट्रीक टन मॅंगो पल्पची निर्यात होते. त्यामुळं 340 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते.
कोकणात गेल्या महिन्यापासून बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बगायतदारांना बसला आहे.
यंदा आंब्याचे पीकही कमी आले आहे. महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड जाली आहे.