Maharashtra Ekikaran Samiti Agitation : महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन; कार्यकर्त्यांचे कागलमध्ये जंगी स्वागत
कर्नाटक सरकार विरोधात एल्गार करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने रणशिंग फुंकले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावमधून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये जिल्हाधिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.
बेळगावमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे कागलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह बेळगावमधून हजारो कार्यकर्ते बसेसने आले आहेत.
पोलिसांकडून कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्राविरोधात कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात ठराव केल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत, दाखवून द्यावे अशी मागणी सीमावासियांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत, दाखवून द्यावे अशी मागणी सीमावासियांनी केली आहे.
सीमावासियांकडून पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या नावे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
आजच्या आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.