Share Market: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार सावरणार की कोसळणार? हे घटक ठरणार प्रभावी
मागील आठवड्यात बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. आता, शेवटच्या आठवड्यात बाजार नेमकी कशी कामगिरी करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारातील आठवडाभरातील व्यवहारावर काही घटक परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात चढ-उतार दिसून येईल.
कोरोना संकटाची गडद छाया शेअर बाजारातील व्यवहारांवर दिसण्याची शक्यता आहे. चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
30 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्यासाठी वित्तीय तूट आणि पायाभूत सुविधांचे आकडे जाहीर केले जातील. सप्टेंबर FY23 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी चालू खाते आणि बाह्य कर्जाचे आकडे देखील 30 डिसेंबर रोजी जाहीर केले जातील.
बाजारातील या आठवड्यासाठी प्रमुख जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा पॉइंट्सचाही घटक परिणामकारक ठरू शकतो.
तेलाच्या किमती सलग दुसऱ्या आठवड्यात वाढल्या पण एकूणच आता जवळपास तीन आठवड्यांपासून ब्रेंट क्रूड फ्युचर्सवर प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली आहेत. काही प्रमाणात मंदीच्या भीतीमुळे मागणीत घट होण्याच्या अंदाजामुळे दर घसरत असल्याचा अंदाज आहे.
जगभरात कोविडच्या नवीन प्रकरणांची तीव्रता अजूनही लॉकडाऊन लादण्याइतकी गंभीर नाही, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मर्यादित चढ-उतार राहिल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) कडून गुंतवणूक अस्थिर असल्याची दिसून आली. मागील दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्स विक्री वाढली आहे.
निफ्टी 50 च्या चार्टवर या आठवड्यासाठी घसरणीची कँडल तयार केली आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता, घसरण राहण्याचा अंदाज आहे.
मासिक F&O एक्स्पायरी आठवड्यात प्रवेश करणार असल्याने बाजारात अस्थिरता दिसून येण्याची दाट शक्यता आहे.