women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
abp majha web team
Updated at:
16 Sep 2024 05:17 PM (IST)
1
दर महिन्याला येणारी मासिक पाळीदरम्यान महिलांना हार्मोन बदलांमुळं पोटदुखीपासून चिडचिड, थकवा आणि असंख्य बदलांना सामोरं जावं लागतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तंदुरुस्त शरिरासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पाळीदरम्यानही व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.
3
पण मासिक पाळीत शरिरातून रक्तस्राव होत असल्यानं अनेक बदल होत असतात. यावेळी काही व्यायामप्रकार करणं टाळावेत असं तज्ञ सांगतात.
4
जर तुम्ही जीममध्ये जात असाल तर कोणतीही जड वजनं उचलणं त्रासाचं ठरू शकतं. यावेळी ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो.
5
काही व्यायाम प्रकारांमुळे तीव्र रक्तस्राव होण्याची शक्यता असते, ज्यामुळे खूप वेदना होऊ शकतात.
6
हलकेफुलके व्यायामप्रकार या काळात करण्याचा सल्ला देण्यात येतो. चालणे, स्ट्रेचिंग असे व्यायाम करावेत