Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ; आठ तासात तीन इंचांनी वाढ
गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (27 जुलै) सकाळी नऊ वाजल्यापासून नदीच्या पाणी पातळीत 3 इंचानी वाढ झाली आहे. दुसरीकडे, राधानगरी धरणातून 8540 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
आज (27 जुलै) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 40 फुट 8 इंचावर पोहोचली आहे.
पंचगंगा इशारा पातळीवरून वाहत असून धोका पातळी 43 फुट आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 45 फुटांवर गेल्यास प्रशासनाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरमधील शाळा उद्यापासून पूर्ववत होणार आहेत.
त्याचबरोबर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबाना उद्या (28 जुलै) घरी परत पाठवलं जाणार आहे.
बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली आहे. नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात पावसाच्या दुर्घटनेत दोन बळी गेले असून त्यांना शासकीय मदत करणार असल्याचेही केसरकर म्हणाले.