Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Police : भुदरगड पोलीस ठाण्याची इमारत जिल्ह्यात हायटेक होईल : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
भुदरगड पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘राधानगरी, आजरा पोलीस ठाण्याच्या अद्यावत इमारती झाल्या, आता भुदरगड पोलीस ठाण्याची सुज्ज इमारत होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभुदरगड पोलीस ठाण्याच्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीची उभारणी झाल्यानंतर पोलीस आणि जनतेची गैरसोय दूर होईल. येथील इमारत जिल्ह्यात हायटेक ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.
भुदरगड पोलीस ठाण्याच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
इमारत बांधकामासाठी 5 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले प्रमुख उपस्थित होते.
येत्या 26 जानेवारीपर्यंत इमारतीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
गारगोटीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न मार्गस्थ लागल्याचे प्रकाश अबिटकर यांनी सांगितले.
भुदरगडला 10 पोलीस कर्मचारी देणार असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी विचारात घेता आदमापूर येथे कायमस्वरूपी पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पोलीस कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाहीही पोलिस अधीक्षकांनी दिली.