Jyotiraditya Shinde in Kolhapur: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचे शाल श्रीफळ देत स्वागत केले.
शिंदे यांच्या समवेत भाजप खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव आदी उपस्थित होते.
लोकसभा प्रवास योजनेंतर्गत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.
या योजनेनुसार ते तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
मागील दौऱ्यात त्यांनी आजरा आणि चंदगड तालुक्यात दौरा केला होता.
ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या नागाळा पार्कमधील नव्या कार्यालयाला भेट देणार आहेत.
त्यानंतर ते विश्वपंढरी हॉलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
शिंदे उद्या रविवारी सकाळी दहा वाजता इचलकरंजी हुलगेश्वरी रोड येथील भाजप कार्यालयास भेट, त्यानंतर स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत.