Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Alcohol from Trees : आता लाकडापासूनही बनवा दारु, जाणून घ्या नेमकी पद्धत काय?
दारुचे (Liquior) प्रकारही विविध आहेत. तुम्ही आतापर्यंत द्राक्ष, तांदूळ, बटाटा, ऊस यापासून दारु तयार होते हे तुम्ही ऐकलं असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंशोधकांनी आता लाकडापासूनही दारु तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे. जपानमधील काही वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.
जपानमधील वैज्ञानिकांनी ही कल्पना शोधली आहे. जपानमधील देवदार नावाच्या झाडापासून दारु तयार केली जाऊ शकते, असं वैज्ञानिकांचं मत आहे.
जपानमध्ये 1600 साली ताहोका येथे देवदार प्रजातीचं झाडं लावण्यात आलं. 1916 मध्ये या झाडामधून एक द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचं निदर्शनास आलं. हा द्रवपदार्थ सफेद रंगाचा होता.
या देवदार झाडामधून सुमारे 35 लीटर द्रवपदार्थ बाहेर पडला. आता संशोधकांनी या द्रवपदार्थापासून अल्कोहोल तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, देवदार आणि चेरीच्या झाडांच्या लाकडापासून आधी मिथेनॉल मिळवले जातं. हे मिथेनॉल पिण्यायोग्य नाही आणि शरीरासाठी हानिकारक आहे. मिथेनॉलचा वापर पेंट प्लॅस्टिक आणि पेंट बनवण्यासारख्या कामांमध्ये केला जातो. याशिवाय त्याचा वापर इंधन बनवण्यासाठीही होतो.
ओत्सुका नावाच्या जपानी तज्ज्ञानं झाडापासून अल्कोहोल (इथेनॉल) बनवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. इथेनॉलपासून बिअर, वोडका आणि वाईन बनवली जाते.
ओत्सुका यांनी लाकडापासून इथेनॉल मिळविण्यासाठी एक विशेष पद्धत अवलंबली आहे. ओत्सुका यांनी सुरुवातीला लाकूड बारीक करून त्याची पेस्ट बनवली. या पेस्टमध्ये एंजाइम आणि यीस्ट टाकून फर्मंटेशन केलं जातं.
त्यानंतर एक द्रव तयार होतो, ज्यामध्ये 15 टक्के अल्कोहोल असते. साध्या भाषेत 3.75 टक्के अल्कोहोल एका लिटर द्रवात तयार होते. आता जपानमध्येही लाकडापासून दारू बनवली जात आहे.