Kolhapur : पंचगंगा नदीमधील जलपर्णी काढत नवदाम्पत्याने केली नवजीवनाची सुरुवात
लग्न मंडपात डोक्यावर अक्षता पडल्या आणि तरुणाने नववधूला घेऊन थेट पंचगंगा नदी गाठली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंचगंगा नदीमधील जलपर्णी म्हणजे केंदाळ काढण्याचे काम करत नवदाम्पत्याने नवजीवनाची सुरुवात केली.
पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा बसला आहे. ही जलपर्णी हटवण्याचं काम देखील सुरु आहे.
कृष्णा इंगळे हा कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी येथील माणुसकी फाऊंडेशनचा सदस्य आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने पंचगंगा नदीतील केंदाळ काढण्याचे काम सुरु आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत कृष्णाला केंदाळ काढण्यासाठी जाता आले नाही.
मात्र कृष्णाने डोक्यावर अक्षता पडताच आपली पत्नी शिवानी हिला घेऊन थेट पंचगंगा नदी गाठली.
इथे येत दोघांनीही केंदाळ काढण्यास सुरुवात केली.
पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यासाठी नवदाम्पत्याने केलेल्या या कामाचे कौतुक संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याभर होत आहे.