कोल्हापूर : मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी आदी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी पाण्याचे पूजन केले.
गतवर्षी पेक्षा पंधरा दिवस उशिरा तलाव भरला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बंधू सर पिराजीराव घाटगे यांनी मुरगूडचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा तलाव बांधला होता.
शहराच्या पूर्वेकडील बाजूस यमगे, शिंदेवाडी, गावच्या हद्दीमध्ये हा तलाव आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बंधू सर पिराजीराव घाटगे यांनी मुरगूडचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा तलाव बांधला होता.
या वर्षाअखेर या तलावाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
पाणीपुरवठा होत असल्याने मुरगुड नगरपालिकेसह नागरिकही तलाव भरण्याची वाट पाहत होते.
या तलावातून 225 एकर शेतीसह मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो.
सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.